चेन्नई-मुंबईसह 40 ठिकाणी तपास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील मद्य धोरणातील घोटाळय़ाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी देशातील 6 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 40 ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.
यावषी दिल्लीत अबकारी घोटाळा उघडकीस आला होता. सध्या यासंबंधी सीबीआय चौकशी करत आहे. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला असून त्यांची सीबीआयने यापूर्वीच कसून चौकशी केली आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी तिहार तुरुंगात जात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचीदेखील चौकशी केली. सीबीआयच्या विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी गुरुवारी ईडीला सत्येंद्र जैन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी दिल्ली मद्य घोटाळय़ाप्रकरणी ईडीने 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाय लखनौ, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि मुंबईतील अनेक मद्यविपेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी मनीष सिसोदियांसह 15 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. मनीष सिसोदिया यांच्या जवळच्या मित्राला एका दारू व्यावसायिकाने एक कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला होता.