Tarun Bharat

संजय राऊतांच्या घरी ईडीचा छापा, 3 पथकांकडून तपास सुरू

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी दाखल झाली आहे. मागील अडीच तासांपासून 10 अधिकाऱ्यांचं पथक राऊतांची चौकशी करत आहे. राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून, कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे.

1034 कोटींहून अधिक रकमेच्या पत्राचाळ जमीन घोटाळय़ाप्रकरणी ईडीचं पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. राऊत यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावलं होतं. मात्र, तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नव्हते. यानंतर आज सकाळी साडेसात वाजता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सध्या ईडीची तीन पथकं या प्रकरणाची चौकशी करत आहे. दोन पथकं इतर ठिकाणी तपास करत आहेत.

काय होतं प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. त्यामुळे या चाळीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक झाली. प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात.

याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं होतं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आज दिवसभर राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा : अविनाश भोसले यांचं हेलिकॉप्टर CBI कडून जप्त

Related Stories

महाबळेश्वरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी

Archana Banage

बापटांनी कधी पैसे वाटले नाहीत

datta jadhav

तळीये गावातील 261 घरांची पुनर्बांधणी वेळेत करा : जितेंद्र आव्हाड

Tousif Mujawar

वेळेपूर्वी दुकाने उघडी ठेवणाऱया चौघांवर गुन्हा

Patil_p

19 वर्षांखालील दक्षिण विभाग क्रिकेट संघ जाहीर

Patil_p

इस्लामपुरात चार दुकान गाळे आगीत खाक; 30 लाखांचे नुकसान

Abhijeet Khandekar