Tarun Bharat

‘सोनिया-राहुल यांना भाजप ईडीच्या माध्यमातून भीती दाखवतंय’

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा आरोप

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेल्या समन्सवरून राजकीय जल्लोष तीव्र झाला आहे. प्रथम भाजप आमदार राजेश्वर सिंह यांनी काँग्रेस नेत्यावर निशाणा साधला. आता याप्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, त्यांना ईडीच्या माध्यमातून राहुल गांधी आणि सोनिया गांधींना घाबरवायचे आहे. बोलावल्यावर ते चौकशीसाठी जाणार. कायदा मोडण्याची बाब नाही, असे म्हणणाऱ्याने सांगावे लागेल की, भाजपचे दलाल म्हणून काम केलं तर तुम्हाला आमदारपद मिळाले. असेच काम करत राहिल्यास खासदारकीही मिळेल, असा हल्लाबोल अधीर रंजन चौधरी यांनी राजेश्वर सिंह यांच्यावर केला आहे.

यापूर्वी, भाजप आमदार राजेश्वर सिंह यांनी १३ जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अंमलबजावणी संचालनालयात हजेरी लावण्यावर आणि काँग्रेसच्या आंदोलनावर ट्विट केले होते. कायदा नेहमीच काँग्रेसपेक्षा मोठा आहे. काँग्रेसने ईडीला तपासात सहकार्य करावे. पीएम मोदींनीही एसआयटीसमोर हजर राहून कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडून शिकावे.

यावर यूपी काँग्रेसने ट्विट केले की, राजेश्वर सिंह थरथरत म्हणत आहेत. महात्मा गांधींनीही सत्याग्रह केला, तेव्हाही हलेलेखोर थरथरत होते, आजही ते थरथरत आहेत. यानंतर राजेश्वर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यूपी काँग्रेस ७ सीटच्या कारमधून २ सीट स्कूटरवर शिफ्ट झाली आहे, परंतु अद्याप काहीही समजू शकले नाही. काँग्रेसला मेहनत करावी लागेल अन्यथा काँग्रेससाठी चाकांची गाडी तयार ठेवावी लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

वास्तविक, नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावले होते. या अंतर्गत राहुल गांधी १३ जून रोजी ईडीसमोर हजर राहू शकतात, तर सोनियांनी प्रकृतीचे कारण देत तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. तत्पूर्वी पक्षाने शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर AICC सरचिटणीस, प्रभारी आणि PCC प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

ज्या दिवशी ईडीने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा पासून काँग्रेस शक्ती प्रदर्शनाच्यातयारीत आहे. राहुल गांधी १३ जून रोजी ईडी समोर चौकशीला हजर त्यादिवशी काँग्रेस आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी काँग्रेस भारतातील सर्व राज्यांमध्ये ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहे. दिल्लीतील ईडीच्या गैरवापराचा आरोप करत सर्व खासदार आणि सीडब्ल्यूसी सदस्य ईडी कार्यालयावर मोर्चा काढतील, असे सूत्रांनी म्हंटले आहे.

Related Stories

उद्योगपतींसाठी काम करतेय सरकार!

Patil_p

NIA ची 14 जिल्ह्यात 45 ठिकाणांवर छापेमारी

datta jadhav

उद्धव ठाकरेंच नामर्दासारखं काम पाहून बाळासाहेबांनाही वाईट वाटत असेल

datta jadhav

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणारा अटकेत

Rohan_P

महाराष्ट्र एक महान राज्य : राष्ट्रपती कोविंद

datta jadhav

केंद्राला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील – राहुल गांधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!