Tarun Bharat

‘शाओमी’चा 5551 कोटींचा निधी ईडी गोठवणार

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ED to freeze Xiaomi’s 5551 crore funds स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘शाओमी’ या कंपनीचा तब्बल 5551 कोटींचा निधी गोठविण्याची परवानगी ईडीला मिळाली आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे. देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्ती असेल.

फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने शाओमी कंपनीविरुद्ध तपास सुरू केला. दरम्यानच्या काळात ईडीला या कंपनीचा 5551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश होते. आता यासाठी ईडीला FEMA Competent Authority कडून निधी गोठवण्याची परवानगी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वी अनेक चिनी ऍप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, आता शाओमी या मोबाईल कंपनीवर कारवाई करण्यात येत आहे.

अधिक वाचा : व्यापाऱ्याला मारण्याची धमकी, छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा

या कंपनीने भारतात 2014 मध्ये काम सुरू केले होते. कंपनीने एकूण 5,551.27 कोटी रुपये परदेशी कंपन्यांना पाठवल्याचे समजते. ईडीने शाओमीचे असेट्स जप्त करण्यासाठी सर्वप्रथम 29 एप्रिल 2022 रोजी आदेश जारी केला होता. परकीय चलन विनिमय कायद्यानुसार या जप्तीसाठी ईडीला FEMA Competent Authority ची परवानगी घेणं अनिवार्य आहे. ही परवानगी आता ईडीला देण्यात आली आहे.

Related Stories

व्हर्लपूल इंडियाच्या नफ्यात 38 टक्के घट

Patil_p

सैन्यतयारी नेहमी उच्चस्तरीय असावी!

Patil_p

अत्याधुनिक युद्ध विमाने बनविण्याच्या मार्गावर भारत

Patil_p

टाळेबंदीमुळे गंगा नदीचे पात्र होतेय स्वच्छ

Patil_p

वायू प्रदूषणामुळे 7 लाख कोटींचे नुकसान

Patil_p

सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायमूर्तींना कोरोना

Amit Kulkarni