Tarun Bharat

खाद्यतेल दर राहणार नियंत्रणात

Advertisements

मार्च 2023 पर्यंत आयात शुल्कात सूट ः दर वाढणार नसल्याने दिलासा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

विशिष्ट खाद्यतेलांवरील आयात शुल्कात सुरू असलेली सूट मार्च 2023 पर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्रीय खाद्य मंत्रालयाने रविवारी सांगितले आहे. जागतिक अस्थिरतेमुळे देशात महागाईदर 7 टक्क्यांवर असताना सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खाद्य तेलांच्या किमती कमी राखण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाकडूनन (सीबीआयसी) 31 ऑगस्ट रोजी आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशातील खाद्यतेलाचा पुरवठा वाढविण्याचा यामागे उद्देश होता. विशिष्ट खाद्यतेलांच्या आयात शुल्कातील सूट मार्च 2023 पर्यंत कायम राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. सरकारच्या या निर्णयामुळे नजिकच्या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर नियंत्रणात राहणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जागतिक स्तरावर खाद्यतेलांच्या किमती कमी होत असल्याने भारतात खाद्यतेलाचे दर खाली येत आहेत. क्रूड पाम ऑईल, आरबीडी पामोलिन, आरबीडी पाम ऑईल, क्रूड सोयाबीन ऑईल, रिफाइंड सोयाबीन ऑईल, क्रूड सनफ्लॉवर ऑईल आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलवरील वर्तमान शुल्क स्वरुप 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

सद्यकाळात पाम ऑईल, सोयाबीन ऑईल आणि सनफ्लॉवर ऑईलवर आयातशुल्क शून्य आहे. भारत स्वतःच्या गरजेच्या सुमारे 60 टक्के खाद्य तेल विदेशातून आयात करतो. मागील काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे खाद्यतेलांचेदर मोठय़ा प्रमाणात वाढले होते. रशिया आणि युक्रेन यांच्यात फेबुवारी महिन्यात सुरू झालेल्या युद्धानंतर भारतात खाद्यतेलाचे दर वाढले होते. परंतु आता खाद्यतेलांचे दर कमी होऊ लागले आहेत.

Related Stories

बाजारामध्ये तीन दिवसांच्या घसरणीला विराम!

Patil_p

भाजपकडून आमदारांच्या खरेदीचा प्रयत्न : केसीआर

Patil_p

प्रभावी लसीसाठी भारत प्रयत्नशील

Patil_p

गुजरातमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप, जीवितहानी नाही

Patil_p

केरळच्या संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ला

Patil_p

ईडीची देशभरात १८ ठिकाणी छापेमारी

Archana Banage
error: Content is protected !!