क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 11 वर्षाखालील पॅरेन्टस् चषक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात एडीफाय संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 48 धावांनी पराभव करुन विजय मिळवला. ओमकार करेहोना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ताहीर सराफ, रोहित पोरवाल, चंदन कुंदरनाड, परशुराम पाटील, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, प्रशांत लायंदर, रवी पिल्ले, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते.
एडीफाय संघाने 25 षटकात 3 गडी बाद 186 धावा केल्या. त्यात ओमकार करेहोनाने 50, शिद्रायने 41 तर विराज पाटील 35 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे आयुष माळवी, श्रीहरी व तन्मय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 7 बाद 138 धावाच केल्या. राघव वी. 23 धावा केल्या. एडीफायतर्फे ओमकार करेहोनाने 3 गडी बाद केले.