क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे मोठय़ा थाटात उद्घाटन करण्यात आले. केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंगवरती आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी डी. एस. डिग्रेज, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, संजीव बडिगेर, एम. एस. मल्लापूर, सी. एस. निडोनी, गुलाबनवर, डी. एन. हलअक्की, आर. पी. जुटण्णावर व स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत 31 जिल्हय़ांच्या जवळपास हजारहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा म्हणजे निवड चाचणी आहे.