Tarun Bharat

बाळासाहेबांनी केलेली युती कोणालाही तोडता येणार नाही

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा घणाघात : बीकेसी मैदानावरीलच खरा शिवसेनेचा दसरा मेळावा

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नेहमीच प्रखर हिंदूत्वाच्या विचारांची उधळण केली. हिंदूत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी भाजपसोबत युती केली. शिवसेना प्रमुखांनी केलेली हि युती कोणालाही तोडता येणार नाही, असा घणाघात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. तसेच दसरा मेळाव्यातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांची उधळण होणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा होवूच शकत नाही. बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचारासाठी आमदारकी पणाला लावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर होणारा दसरा मेळावाच शिवसेनेचा खरा दसरा मेळावा असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर दौऱयावर असलेले जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

हे ही वाचा : दारु तस्करांना मोका लावणार; मंत्री शंभूराजे देसाई

मंत्री केसरकर म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दसरा मेळावा सुरु केला. या मेळाव्यातुन त्यांनी नेहमीच हिंदूत्वाच्या विचारांची उधळण केली. तसेच जेंव्हा काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेंव्हा मी माझा पक्ष बंद करेन, असे शिवसेनाप्रमुखांनी म्हटले होते. मात्र सध्या चाळीस आमदार दूरावूनही काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडली जात नाही. त्यामुळे त्यांचा दसरा मेळावा शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणता येणार नाही. शिवसेना ही आमचीच असल्याचे सिद्ध करुन दाखवू, असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

संधी होती तेंव्हा काम केले नाही
मुख्यमंत्री काम करणारे असल्याने त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टिका करुन जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. टिका करणारे काम करत नसतात आणि काम करणारे टिका करत नसतात. यांना काम करण्याची संधी होती तेंव्हा बाहेर पडले नाहीत. आता मुख्यमंत्री काम करत आहेत, तर त्यांच्यावर नाहक टिका करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मंत्री केसरकर यांनी केला.

दोन्ही बाजूंनी हेच आरोप करतील
बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांची वाहने पार्कींग करण्यासाठी येथील विद्यापीठाची जागा सोयीस्कर आहे. उद्या मेळाव्यावेळी ट्राफीक समस्या निर्माण झाल्यास हेच लोक दोन्ही बाजूने टिका करतील असा टोला युवासेनेला लगावला.

वंदे मातरम् म्हटलेच पाहिजे
सगळ्य़ांनी वंदे मातरम् म्हटलेचे पाहिजे. हा निर्णय योग्य आहे, याबाबत काही मतमतांतरे असली तर त्यांची समजूत काढू असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

मराठी पाट्य़ा लावल्याच पहिजे
ज्या राज्यात राहतो तेथील भाषेचा आदर केलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा कोणी नाकारत असले तर त्यांना येथे राहण्याचा अधिकारी नाही. तसेच येथील दुकानांवरही मराठी पाटय़ा लागल्याच पाहिजे. प्रसंगी दुकानदारांशी बोलून मुदतवाढ देवू असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

वर्षभरात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील

datta jadhav

काँग्रेसला अर्धवेळ नाही, पूर्णवेळ अध्यक्ष हवा – पृथ्वीराज चव्हाण

Archana Banage

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे उर्वरीत प्रश्न मार्गी लावा

Archana Banage

प्रदूषणप्रश्नी आराखडा करावा : सतेज पाटील

Archana Banage

Income Tax Raid : जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३९० कोटींची मालमत्ता जप्त

Archana Banage

केरळमधील हत्तीणीची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या

Archana Banage