Education Minister Deepak Kesarkar exercised his right to vote
खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक
खरेदी विक्री संघाचा मी सभासद असून मी हे मतदान केलं . परंतु भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना ही एकत्र निवडणूक लढत असून निश्चितच आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे केला. दरम्यान खरेदी विक्री संघ हा जर एक वेगळा उंचीवर देऊन ठेवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढत आहोत तसेच ही निवडणूक बिनविरोध देखील करायची होती. परंतु ती होऊ शकली नाही त्यामुळे नक्कीच विजय हा आमचा असेल असं केसरकर यावेळी बोलताना म्हणाले .श्री केसरकर यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सावंतवाडी / प्रतिनिधी