Tarun Bharat

शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रतिनिधी / सांगली :

जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (education officer vishnu kamble)आणि अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (superintendent vijaykumar sonavne) या दोघांना 1 लाख 70 हजार रूपये लाच स्विकाराताना रंगेहात (red handed arrest taking bribes) पकडण्यात आले. ही कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. या दोघांनी पदवीधर वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्यासाठी ही लाच स्विकारली आहे. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्याचा सहकारी शिक्षक या तिघांकडून पदवीधर वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 60 हजार याप्रमाणे 1 लाख 80 हजार रूपये लाचेची गागणी केली होती. अखेरीस 1 लाख 70 हजार रूपयांवर हा व्यवहार ठरला होता. त्यानंतर या तक्रारदारांनी याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने याची शहानिशा केली असता ही तक्रार योग्य असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांच्याविरूध्द जिल्हा परिषद कार्यालय सांगली तसेच कांबळे यांच्या राहत्या घराजवळ सापळा लावण्यात आला आणि 1 लाख 70 हजारांची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने वाढवली नाईट कर्फ्यूची वेळ

Tousif Mujawar

मुसळधार पाऊसाने दिघंची परिसरात हाहाकार,शेतकरी उध्वस्त

Archana Banage

वृध्देला बोलण्यात गुंतवून 50 हजारांचा दागिना लंपास

Patil_p

उघडय़ा गटारामुळे अनेकांचे जीव धोक्यात

Patil_p

गंभीर : जिल्हय़ात 12 बाधितांच्या मृत्यूने खळबळ

Patil_p

कोरोनाचे आणखीन दोन बळी, दिवसभरात 19 रूग्ण वाढले

Archana Banage