Tarun Bharat

चंद्रग्रहणाचा बाजारपेठेवर परिणाम

प्रतिनिधी/ बेळगाव

खग्रास चंद्रग्रहणाचा मंगळवारी बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. चंद्रग्रहण काळात बाजारपेठेतील काही दुकाने बंद होती. शिवाय ग्राहकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील काही भागात शुकशुकाट पसरला होता. दर मंगळवारी बाजारपेठ काहीशी थंडावलेली असते. त्यातच मंगळवारी चंद्रग्रहण असल्यामुळे बाजारपेठ शांत झालेली पहायला मिळाली.

दिवाळी, तुळशी विवाह यामुळे बाजारपेठ मागील आठवडय़ाभरापासून बहरली आहे. मात्र मंगळवारी चंद्रग्रहणामुळे बाजारपेठ काहीशी थंडावलेली पहायला मिळाली. त्यामुळे एकूण उलाढालीवरही परिणाम झाला. ऐन पौर्णिमाकाळातच चंद्रग्रहण लागल्याने खरेदीवर परिणाम झाला. सणासाठी बाजारात फूल, हार, पूजेचे साहित्य, फळे आणि इतर साहित्यांची आवक वाढली होती. सोमवारी बाजारात पूजेच्या साहित्याबरोबरच फुलांची आणि उसाची विक्री वाढली होती. मात्र दुसऱया दिवशी म्हणजेच मंगळवारी चंद्रग्रहणामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला पहायला मिळाला.

दिवाळी आणि तुळशी विवाहासाठी मागील काही दिवसांपासून बाजारपेठ बहरली आहे. विविध साहित्यांनी दुकाने सजली आहेत. त्यामुळे उलाढालही वाढली आहे. कोरोनाच्या संकटानंतर यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा उत्साह वाढला आहे. मात्र मागील पंधरा दिवसांत सूर्यग्रहण आणि मंगळवारी चंद्रग्रहणामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. चंद्रग्रहणामुळे मंगळवारी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत. त्यामुळे खरेदी-विक्री थंडावली होती.

Related Stories

पशुसंगोपन राबविणार गावरान कोंबडी वाटप योजना

Amit Kulkarni

सलग दुसऱया दिवशी परतीच्या पावसाची रिपरिप

Patil_p

जिल्हाधिकाऱयांची नुकसानग्रस्त भागात पाहणी

Amit Kulkarni

रोज चषक बेबी फुटबॉल स्पर्धेत मानस अकादमी उपविजेता

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये भगतसिंग जयंती साजरी

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्राम पंचायतीमध्ये 91 टक्के मतदान

Patil_p