Tarun Bharat

सप्ताहातील अंतिम सत्रही प्रभावीत

सेन्सेक्स 237 अंकांनी नुकसानीत ः निफ्टी 18100 च्या खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

  चालू सप्ताहातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात एफएमसीजी, धातू आणि औषध क्षेत्रात मजबूत विक्री झाल्याच्या कारणास्तव सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 236.66 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमधून बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर  जळपास 236.66 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 60,621.77 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीयशेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 80.20 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,027.65 वर बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील स्थिती व तिमाहीमधील कंपन्यांचे सादर होणारे अहवाल यांचा परिणाम हा बाजारातील कामगिरीवर राहिला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.84 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत, अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स 2.79, बजाज फायनान्स 2.57, नेस्ले इंडिया 2.37 टक्के तसेच बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस, सनफार्मा, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट व टेक महिंद्रा यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, टाटा मोर्ट्स, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. चीनमधील आर्थिक गतीचा प्रवास पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच देशातील शेअरबाजारात सुरुवातीला काहीसा लिलावाचा ट्रेंड पहावयास मिळणार होता. पण जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीच्या कारणास्तव गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे सप्ताहातील अंतिम सत्र प्रभावीत होत बंद झाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. याच दरम्यान बँकिंग समभाग वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबदबा राहिला होता.

Related Stories

जागतिक पातळीवर कॉम्प्युटर विक्रीत 11.2 टक्क्मयांनी वाढ

Patil_p

ऊर्जा, बँक समभागातील विक्रीने सेन्सेक्स प्रभावीत

Patil_p

जनधन योजनेमध्ये एकूण 41.93 कोटी खाती

Patil_p

देशात 14 लाख टन साखरेचे उत्पादन

Omkar B

भारताचे प्रयत्न गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे

Patil_p

पेटीएमचे समभाग नुकसानीतच

Patil_p
error: Content is protected !!