Tarun Bharat

Kolhapur : प्राथमिक दूध संस्‍थांचे दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न गरजेचे; ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील

नवीन नोंदणी झालेल्या दूध संस्था प्रतिनिधी व उत्पादक यांच्याशी बोलताना केले मार्गदर्शन

कसबा बीड / प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे नवीन नोंदणी झालेल्या दूध संस्‍थां प्रतिनिधी व दूध उत्पादक यांच्याशी दीपावली निमित्त सदिच्छा भेटीदरम्यान चर्चा करताना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले की, गोकुळने प्राथमिक दूध संस्‍था व दूध उत्‍पादक केंद्रबिंदू मानून त्‍यांच्‍या हिताचा कारभार केला असुन प्राथमिक दूध संस्‍था पदाधिका-यांनी संस्था व दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. गोकुळच्या विविध योजनांची माहिती दूध उत्पादकांना देऊन त्यांचे हित साधण्याचा प्रयत्न करावा. तसेच दूध वाढ कृतीकार्यक्रम अंतर्गत संघाचे म्हैस दूध वाढ होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे मार्फत जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत जातिवंत म्हैस खरेदी कर्ज योजने बाबतची सविस्तर माहिती दूध उत्पादकांना करून द्यावी व म्हैस दूध वाढ होण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे. ग्रामीण भागातील तरुणांनी आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाकडे वळावे. यासाठी संघामार्फत मार्गदर्शन करू असे मनोगत पाटील यांनी केले.

तसेच भागांतील दुध उत्पादकांच्या बरोबर संवाद साधून दुग्ध व्यवसायासंबधी असणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी दूध संस्थाच्या वतीने दूध दर वाढ केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचा विविध दूध संस्थेच्या वतीने श्री अध्यक्ष यांचे तेल चित्र देऊन दिपावली निमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त संस्था प्रतिनिधीच्यावतीने एस डी जरग, एस के पाटील, अनिल सोलापुरे, अनिल बचाटे आदींची मनोगते झाली.

यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील,तुकाराम पाटील, शिरोली गावचे डे.सरपंच सचिन पाटील,सुनील पाटील,राहुल पाटील,नंदकुमार पाटील,वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे, एस.के.पाटील, सुभाष पाटील, विलास पाटील चांदे,सर्जेराव पाटील (कोपार्डे), सागर पाटील, स्वरुपसिंह पाटील (सडोली दु.) एस.डी.जरग (महे), निवृत्ती पाटील (आमशी)के.के.चौगले (पासार्डे),दिंगबर बाटे (स्वयभूवाडी) युवराज दिंडे (बहिरेश्वर), सौ.अर्चना हिमंत देसाई (कळंबे), सागर कारंडे (सावर्डे), भगवान पाडळकर,(सावर्डे) अनिल बचाटे (बहिरेश्वर), बाजीराव पाटील(आमशी), कृष्णात जाधव (सावरवाडी), संदीप चौगले (माजगाव), ईश्वरा कदम (कदमवाडी) तसेच विविध दूध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

दरवाजे तोडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Archana Banage

फक्त दहा रुपयात औषधोपचार

Archana Banage

हद्दवाढीसाठी आतापासून तयारी ठेवा: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 17 जणांचा मृत्यू, 797 नवे रुग्ण

Archana Banage

महाविकास आघाडीचा उद्या मेळावा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 7 बळी, 293 पॉझिटिव्ह

Archana Banage