Tarun Bharat

मैदानांना पुनरुज्जीवन देण्यासाठी हवे प्रयत्न

उद्योग खात्रीतून मैदान साफ-त्यांच्या देखभालीची काळजी घेण्याकडे अधिकाऱ्यांकडून हेतेय दुर्लक्ष

प्रतिनिधी/ बेळगाव

आजची पिढी सध्या फेसबुक, वॉटस्अप आणि इतर माध्यमांत गुंतली आहे. मात्र त्यांच्या सुदृढ आरोग्य आणि शारीरिक फिटनेसच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही सध्या मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत. दरम्यान उद्योग खात्रीतून मैदानांना पुनरुज्जीवन देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेतून मैदानांसाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी अनुदान मंजूर होते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे याचा फटका आता मुलांना बसत आहेत.

यापूर्वी उद्योग खात्री योजनेंतर्गत दक्षिण मतदार संघ, यमकनमर्डी मतदार संघ आणि ग्रामीण मतदार संघात तब्बल 55 मैदानांना पुनरुज्जीवन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. काही ठिकाणी मैदानांची उभारणीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या देखभालीकडे आणि काही ठिकाणी मैदाने निर्माण करण्याकडे दुर्लक्ष झाले. आता तर या योजनेतून मैदानांचे पुनऊज्जीवन करण्यात येते, याची माहितीही अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मैदाने नसल्यामुळे गल्लीबोळात खेळ खेळण्याची वेळ सोशल मीडियाच्या माध्यमात गुरफटलेल्या तऊणांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होताना दिसत आहेत. तर शहरी भागात खेळण्यासाठी मैदानांचा अभाव असून त्यासाठी प्रशासनही हतबल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भागातही अशीच अवस्था निर्माण झाली आहे. अनेक गावांत मैदाने नसल्यामुळे गल्लीबोळात विविध खेळ खेळण्यात येत आहेत. त्यामुळे खेळांच्या मैदानांची कसर भऊन काढण्यासाठी विविध माध्यमातून उपाय आखणे गरजेचे आहे

Related Stories

पंतप्रधानांच्या दौऱ्याचा बाजारपेठेवर परिणाम

Amit Kulkarni

विविध अटींच्या बडग्याने पक्षकारांचे अतोनात हाल

Patil_p

मुतगा येथे अंगणवाडी बांधकामाला चालना

Amit Kulkarni

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकमुळे शनिवार खूटवर धावपळ

Amit Kulkarni

कुदेमनीत मंगळवारी शुकशुकाट

Amit Kulkarni

मंडोळी येथे कचरा डेपो उभारण्याचा घाट

Amit Kulkarni
error: Content is protected !!