Tarun Bharat

शाळांमध्ये अंडी वितरणाला सुरुवात

विद्यार्थ्यांमधील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

शालेय विद्यार्थ्यांना बुधवारपासून अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी व चिक्की देण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा आहार देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमधील कुपोषणाची समस्या दूर व्हावी, यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.

सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य असल्यामुळे अनेकांमध्ये कुपोषणाची समस्या जाणवत आहे. कुपोषित मुलांना सकस आहार मिळावा, यादृष्टीने मागील वर्षभरापासून कर्नाटक राज्य सरकारने अंडी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अंडी वाटप करण्यासाठी काही धर्म व संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे ही योजना थंडावली होती. यावषी शिक्षण विभागाने पुन्हा एकदा अंडी देण्याचा निर्णय घेतला असून जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, त्यांना शेंगदाणा चिक्की व केळी दिली जाणार आहेत.

बुधवारपासून राज्यासह बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात अंडी वितरणाला सुरुवात करण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात 45 दिवस मध्यान्ह आहाराबरोबर केळी, शेंगा किंवा अंडी दिली जाणार आहेत. राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता इतर जिल्हय़ांमध्ये अंडी वितरण केली जाणार आहेत.

शिक्षकांची डोकेदुखी वाढली

शालेय शिक्षकांना शिक्षणासोबत इतर कामांना जुंपणे हा प्रकार काही नवीन नाही. मुख्याध्यापकांना मध्यान्ह आहाराचा हिशेब ठेवावा लागतो. त्याचबरोबर आता अंडी, केळी व चिक्कीचाही हिशेब ठेवावा लागणार आहे. एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करताना नाकी नऊ येत असताना अशाप्रकारे शिक्षकांनाच कामाला जुंपले जात असल्याने याचा परिणाम गुणवत्तेवर होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

Related Stories

जलसंवर्धन ही काळाची गरज

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालय भागात रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

भांदुरगल्ली रेल्वे मार्गाखाली पाईप घालण्याच्या कामास प्रारंभ

Amit Kulkarni

खानापुरात आज हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

Amit Kulkarni

महानगरपालिकेकडून घरोघरी तिरंगा

Amit Kulkarni

गणेश चतुर्थीनिमित्त जादा बसेस

Amit Kulkarni