Tarun Bharat

हुबळीत भीषण अपघातात ८ ठार, मृत्यूमधील ६ जण कोल्हापुरातील?

Advertisements

हुबळी-धारवाडच्या तरिहाळा बायपासवर लॉरी आणि खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृत्यू झाल्यामध्ये दोन जण कर्नाटकातील तर उर्वरित सहाजण कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

जखमी २६ जणांना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून बंगळुरूकडे निघालेली नॅशनल ट्रॅव्हल्स बस असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकमधील चालक आणि क्लिनरसह तिघांचा मृत्यू झाला. खासगी बसमधील चौघांचा मृत्यू झाला. हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त लबौराव यांनी किमच्या हॉस्पिटलला भेट देऊन पीडितांचे सांत्वन केले.

नॅशनल ट्रॅव्हल बस चालक अतावुल्ला, नागराजू, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी बाबूसाब (५५), म्हैसूर येथील मोहम्मद दयान (१७) यांच्यासह किमान आठ जण ठार झाले. हुबळी येथील एका हॉस्पिटलमध्ये २६ जणांवर उपचार सुरू आहेत. अपघातात चक्काचूर झालेली दोन्ही वाहने पोलिसांनी मोकळी करून वाहतूक सुरळीत केली आहे.

error: Content is protected !!