प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महापालिकेत कित्येक वर्षे सेवा बजावणारे आठ कर्मचारी गुरुवारी निवृत्त झाले. कौन्सिल सेपेटरी महादेव बनसे यांच्यासह द्वितीय श्रेणीतील लिपिक शिवाजी मन्नोळकर व सहा कर्मचाऱयांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सर्व निवृत्त कर्मचाऱयांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
महापालिका आयुक्त रुदेश घाळी आणि सामान्य प्रशासन आयुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी सेवानिवृत्त कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेत काम करणारे कर्मचारी एकाच दिवशी निवृत्त झाले आहेत. आठ कर्मचारी निवृत्त झाल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे पाच द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱयांना बढती मिळाली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त झाली आहेत.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयांमध्ये कौन्सिल सेपेटरी महादेव बनसे, जन्म-मृत्यू दाखले विभागात कार्यरत असलेले द्वितीय श्रेणीतील लिपिक शिवाजी मन्नोळकर तसेच शिपाई गोविंद शिंदे, एस. ए. चौगुले आणि वॉल्व्हमॅन हुंदरे, स्वच्छता निरीक्षक देवेंद्र कांबळे, वाहनचालक हनीफ चाँदवाले आदीसह स्वच्छता कर्मचाऱयांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱयांना शुभेच्छा देऊन आयुक्तांनी निरोप दिला.
यावेळी नगरयोजनाधिकारी बसवराज हिरेमठ, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडपण्णावर, पदाधिकारी संजय कांबळे, सुरेश द्यावण्णावर, महसूल निरीक्षक एल. एस. बचलपूरी, संतोष कांबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.