Tarun Bharat

‘एक राखी ‘सैनिकांसाठी’- ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम !

Advertisements

मालवण / प्रतिनिधी

मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून भारतीय सैनिकांना पाठविण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे. ज्यांच्या अभूतपूर्व त्याग व बलिदानामुळे आपण व आपले राष्ट्र सुरक्षित आहे, अशा शूरवीर भारतीय सैनिकांबद्दल समाजामध्ये आदर निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ व्हावी म्हणून शाळेने यापूर्वीही हा उपक्रम अनेकदा राबविला आहे. शाळेमार्फत सैन्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात भारतीय सैनिकांबदल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी खूप मेहनत घेतली.

Related Stories

नारायण राणेंकडे केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी, सिंधुदुर्गात जल्लोष

Ganeshprasad Gogate

पीक विमा माहिती रथाचे दोडामार्ग येथे स्वागत

NIKHIL_N

खेड तालुक्यात घरांवर दरड कोसळल्याने १७ जण अडकले; बचावकार्य सुरु

Abhijeet Shinde

चिपळूण, राजापूरात मृत पक्षांमुळे सतर्कता

Patil_p

दापोलीत ‘हनी ट्रप’ने अनेक जण धास्तावले

Patil_p

वजराट शाळा नं.१ येथे बोअरवेलचा शुभारंभ

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!