ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेते पदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यप्रतोदपदी शशिकांत शिंदे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांच्या नावाची घोषणा उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केली.
राष्ट्रवादीकडून निलम गोऱ्हे यांना याबाबतचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामाध्यमातून जळगावात राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल.
अधिक वाचा : कुख्यात गुंड सचिन मानेसह 13 जणांवर मोक्का कारवाई