ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळची आढावा बैठक आणि दिवसभरातील कार्यक्रम आटोपून शिंदे सायंकाळी कात्रजमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत. याच दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील पुण्यात शिवसंवाद यात्रा काढत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे शिंदे आणि एकनाथ शिंदे कात्रजमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. आज सायंकाळी 7 वाजता ते कात्रजमध्ये शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे कात्रज चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते कात्रजमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते आमने-सामने आल्यावर नेमकं काय होणार?, याकडे दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा वादात?; नामांतरावरुन ‘त्या’ उद्यानाचं उद्घाटन रद्द