Tarun Bharat

ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणारा एकनाथ शिंदे गट थेट सर्वोच्च न्यायालयात, आज सुनावणी

Advertisements

ऑनलाईन टीन/तरुण भारत

Maharashtra Political Crisis : गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या सत्तानाट्याचा खेळ अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेविरोधात बंड करून ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आता थेट सर्वोच्च न्यायालयाच धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप अशा दोन मागण्या शिंदे गटाकडून करण्यात आल्या आहेत. याची याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत. नेमका काय निकाल लागेल. कोर्ट काय सुनावणी करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra Politics Updates)

सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचं खरं हिंदुत्व हेच असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना त्यांचीच असल्याचंही शिंदे म्हणाले. मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला कोणतं वळण लागणार याची चर्चा वर्तुळात रंगली आहे.

Related Stories

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

Abhijeet Shinde

मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

datta jadhav

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

prashant_c

पुणे विभागातील 3 लाख 40 हजार 953 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला

datta jadhav

अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंना मिळणार विशेष सुरक्षा

datta jadhav
error: Content is protected !!