ऑनलाईन टीम/ तरुण भारत
बाळासाहेबांचे हिंदुत्व त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत सध्या ४६ आमदार आमच्यासोबत आहेत. सत्तेसाठी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही अशी आमची भूमिका आहे. स्ट्रॅटेजी ठरवल्यानंतर पुढची भूमिका घेऊ असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेच्या गटनेतेपदी विषयी बोलताना ते म्हणाले, गटनेता हा बहुमताने निवडला जातो. अजय चौधरी यांना गटनेते पद मिळाले ते नियमबाह्य आहे. मात्र तांत्रिक विषय असल्याने या विषयी बोलणे उचित नाही. मी शिवसेनेत आहे शिवसेना सोडली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी काल मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. दरम्यान त्यांनी मुख्य़मंत्री उध्दव ठाकरे यांच्याशीही त्य़ांनी संवाद साधला. सकाळपासून गुलाबराव पाटील हे नाॅटरिचेबल झाले आहेत. तर गीता जैन या ही गुवाहाटीला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्य़ान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील शिंदेंच्या गटात सामील झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. ते गुहावटीला रवाना झाले आहेत.