Maharashtra Cabinet Expansion 2022: युती सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार हाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल होत. अखेर आज ११ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपालांच्या उपस्थितीत भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, डाॅ. वियकुमार गावित,गिरीश महाजन, डाॅ. सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील,दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे,उदय सामंत,तानाजी सावंत, अब्दुल सत्तार,दिपक केसरकर, शंभुराजे देसाई यांनी शपथ घेतली.
आज पार पडलेल्या शपथविधीमध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र अपक्षांना संधी देण्यात आलेली नाही. आज पहिल्या टप्यातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
विकासाची कामं मार्गी लावणार. सर्व मंत्री आपापली जबाबदारी पार पाडतील. लोकाभिमुख काम करतील. मतभेद असणार नाहीत. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले, पुढच्या काळात चांगली कामे करणार. तर तानाजी सावंत म्हणाले, जी खाती देतील ती घेऊ पण राज्यात चांगली कामे करु. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री य़ांचे आभार मानले.


previous post
next post