Eknath Shinde Cabinet Expansion : राज्यात युती सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दोन जणांचे सरकार असल्याची वारंवार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाली असून आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. उद्या, शुक्रवारी (ता.५) रोजी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. तर भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. त्यामुळे विस्तारावेळी नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.
भाजपकडून यांना मिळू शकते संधी?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar),गिरीश महाजन (Girish Mahajan),राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe),बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar),प्रवीण दरेकर (Pravin Darekar),रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan),नितेश राणे (Nitesh Rane).
शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil),उदय सामंत (uday Samat),दादा भुसे (Dada Bhuse),शंभूराज देसाई (Shambhuraj Desai),अब्दुल सत्तार (Abdul Sattar),दीपक केसरकर (Deepak Kesarkar),संदीपान भुमरे (Sandipan Bhumare),संजय शिरसाट (Sanjay Shirsat).
Previous ArticleKolhapur; महापालिका निवडणूकीचा पुन्हा श्रीगणेशा
Next Article कंटेनर – बस अपघातात १५ प्रवासी जखमी .
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.