राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. मागील काही दिवासांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलचं तापलंय. आमदारांनी घरवापसी करावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. तर बंडखोरांना मविआतून बाहेर पडायचे आहे. दरम्यान काल एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढण्यात आली. यावरुन आता शिंदे यांनी ट्विट करत थेट इशारा दिला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1540560670676361216?s=20&t=KJ9bCCJais3-CtwgYq3Arg
एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी एक लिस्टही शेअर केली आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारचीचं; एकनाथ शिंदे
Advertisements