एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान नाना पटोले यांनी कोर्टाच्या सुनावणी नंतर माध्यमांशी संवाद साधला. मात्र भाजपने याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील याविषयी बोलणं टाळलं. मी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही असे ते म्हणाले. याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकिची तयारी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.
हैद्राबादमध्ये भाजपच्या कोअर कमिटी बैठक आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकिच्या तयारीत आहे. सागर बंगल्यावर कोणत्याही बैठका सुरु नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी भेटीसाठी अनेकजण येत असतात. मी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. शिवसेनेचा अंतर्गत विषय त्यावर बोलणं चुकीचं आहे. सेनेने काय कराव याबाबत आम्ही का बोलावं? शिवसेनेतल्या दोन गटातला संघर्ष आहे, भाजपचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा- बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; सुनावणी लांबली
राज्यात एवढ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीसांनी का मौन का बाळगले असा प्रश्न विचारताच चंद्रकांतदादा म्हणाले, बोलण्यासारखं काही नाही म्हणून फडणवीसांचं मौन आहे.

