Tarun Bharat

Election 2022 : राज्य सरकारचा निर्णय: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच

Advertisements

Election 2022 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच म्हणजेच जुन्याच पद्धतीने होणार असून नवी रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला शिंदे सरकारने मोठा धक्का दिला आहे. तसेच हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. तसेच मविआ सरकारने वाढविलेल्या वॉर्ड संख्या नियमबाह्य असल्याने ते रद्द करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत. मुंबई पालिकेमध्ये सदस्य संख्या २२७ चं राहणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकित घेण्यात आला आहे.

हेही वाचा- शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार; लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार

वाॅर्ड पुनर्रचना रद्दचे परिणाम काय होतील?

-मुंबईत वाॅर्ड पुनर्रचनेचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो.

-मुंबईत वाॅर्डची संख्या २२७ च राहणार. याचा परिणाम शिवसेनेवर होईल.

-वाॅर्ड पुनर्रचना आणि वाॅर्डची संख्या वाढवण्याचा निर्णय मविआने घेतला होता.

-आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेनेला या सर्वाचा फटका बसू शकतो.

Related Stories

सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी चाहत्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

रविवार पेठेतील सैनिकनगर मायक्रो कंटेन्मेंट झोन

Patil_p

‘कोरोना काळात ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांचे काम कौतुकास्पद’ – मंत्री गायकवाड

Abhijeet Shinde

पुणे विभागात 30 हजार 508 क्विंटल अन्नधान्याची, तर 14 हजार 63 क्विंटल भाजीपाल्याची आवक

prashant_c

कंगनाच्या ऑफिसवर मुंबई पालिकेचा हातोडा

Rohan_P

दिल्लीत मागील चोवीस तासात 1366 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 31309 वर

Rohan_P
error: Content is protected !!