ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गोव्यात आहेत. बुधवारी ते गुवाहाटीहून गोव्यात आले आहेत. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी गोवा येथे आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आतापर्यंत सत्ता स्थापनेबद्दल स्पष्ट भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली नव्हती. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर रा्ज्यपालांना भेटायला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले तर मुंबईत आल्यावर सर्वात प्रथत ते राजभवनावर जाणार आहेत.