Tarun Bharat

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा; कृषीदिनी एकनाथ शिंदेंचा निर्धार

Advertisements

एकनाथ शिंदे गटातील सगळे आमदार उद्या मुंबईत दाखल होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अधिवेशनात ते सहभागी होणार असून, आज आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला ते स्वत: उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा असा निर्धार केला. पुढे बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार मेट्रो प्रकल्प लवकरच मार्गी लावणार. य़ा बरोबरचं रखडलेल्या प्रकल्पांना देखील मार्गी लावणार आहे. राज्यातील विकास कामांना गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीस मुंबईकडे रवाना

आज कृषी दिन आहे. राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेण्यात येणार आहेत. शेतीला हमीभाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखी -समृध्द होण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी सरकार संकल्प करत आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा असा निर्धार केल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषदेत घेतल्या नागरिकांच्या समस्या ऐकून

Patil_p

दिवसभरातील मृतांच्या आकडय़ात वाढ

Patil_p

धोका वाढला : दिल्लीत कोरोना बाधितांचा आकडा 1, 38, 482 वर 

Tousif Mujawar

पृथ्वीराजबाबा म्हणतात…हा शासनाचा कार्यक्रम

Abhijeet Khandekar

अवंतीपोरा चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

आठ राज्यांना मिळणार नवे राज्यपाल

datta jadhav
error: Content is protected !!