Tarun Bharat

संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करून दाखवा, एकनाथ शिंदेचा ठाकरे,राऊतांना इशारा

गुवाहटी: तब्बल सात दिवसानंतर गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेल मधून बाहेर येऊन एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. इथं येणारे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. ते सर्व आनंदात तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी आले आहेत. गुहावटी मधील कोणतेही आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. हा दावा खोटा आहे. जे आमदार संपर्कात आहेत त्यांची नाव सांगून दाखवा, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिला आहे.

राज्यातील सत्ता नाट्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी येथे घेऊन गेलेत. तब्बल सात दिवसानंतर त्यांनी हॉटेलबाहेर येऊन फेरफटका मारला. माध्यमांच्या विनंतीनुसार त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्हाला जे हवे आहे, ते तुम्हाला देतील. मात्र बंडखोर आमदारांपैकी एकही आमदार कोणाच्याही संपर्कात नाही. हा दावा खोटा आहे. ते इथे आनंदात आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केलेली नाही. सर्व आमदार आनंदात असून ते स्वतःच्या मर्जीने येथे आलेआहेत. जे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत त्यांची नावे जाहीर करून दाखवावेत. त्याचे स्पष्टीकरण सुद्धा येईल. असा इशाराही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या बाबत दिशाभूल करण्यासाठी ही त्यांची चाल आहे असेही शिंदे म्हणाले.

स्वतःच्या स्वार्थासाठी पन्नासजण इकडे आलेले नाहीत,तर बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

दारिद्र्य निर्मूलनात भारत आघाडीवर

datta jadhav

निवडणूक पदवीधरांची प्रचारात उठाठेव राजकारण्यांची

Patil_p

”विजयासाठी देशाला वेठीस धरणाऱ्या मोदींना बंगालच्या जनतेने धूळ चारली”

Archana Banage

कोल्हापूर : अकाऊंट हॅक, 29 लाखांची फसवणूक

Archana Banage

केएसएच्या मुलींचा फुटबॉल संघ नाशिकला रवाना

Abhijeet Khandekar

निधी वाटपात कोणताही दुजाभाव नाही

Patil_p