Tarun Bharat

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं; नावात हिंदू हृदय सम्राटांचा उल्लेख

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असा ठाम निर्णय घेतल्यानंतर जवळपास ४० आमदार त्यांच्या गोटात सामील झाले आहेत. काल निलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला विलिन व्हावं लागेल असा सूचक इशारा दिला होता. तसेच कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये विलीन व्हावे लागेल, शिवसेनेचा भगवा त्यांच्या खांद्यावर राहणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गटाचं नाव निश्चित केले असून, लवकरचं नावाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.

दीपक केसरकर म्हणाले, आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गटाचं नाव “शिवसेना बाळासाहेब” असं ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख असल्याने शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर

Rohan_P

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

Abhijeet Shinde

गांजाला ड्रग्जच्या यादीतून हटवले!

datta jadhav

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलिस जखमी

Sumit Tambekar

‘बायो-ई’ची लस २५० रुपयात

Patil_p

काँग्रेसला द्रमुकने दिला झटका

Patil_p
error: Content is protected !!