ऑनलाईन टीम/ तरुण भारत
बंडखोर आमदार परत यावेत यासाठी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. मात्र बंडखोर आमदार मविआतून बाहेर पडा या मागणीसाठी आग्रही आहेत. या वादंगात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेशी गद्दारी केली आहे असा आरोप शिवसैनिक करत आहेत. यावर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन आमदार शिंदे गटात सामील झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले शिंदे ट्विटमध्ये
कोणत्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नाही. आम्ही खरतर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच एकनाथजी शिंदे यांच्यासोबत एकत्रित आलो आहोत अस सांगितलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी हॅश टॅगचा वापर करत #रायगड जिल्हा #अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी जो हिंदुत्वाचा निर्णय घेतला आहे, त्याकरिता रायगड जिल्ह्यातील आम्ही तीनही आमदार एकत्रित आलो आहोत असेही सांगितले आहे.
हेही वाचा- राज्यपालांच्या ‘या’ अटींनी ‘मविआ’च्या पळवाटा झाल्या बंद
तिसऱ्या ट्विटमध्ये जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी अफवांना बळी पडू नये ही अशी विनंती केली आहे. बंडखोर आमदार यात म्हणतात की, गुवाहटीमध्ये म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वखुशीने आलो असून एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती.
हेही वाचा- कोल्हापुरात शिवसेना आक्रमक; प्रकाश अबीटकरांच्या घरावर हल्लाबोल
माझ्या मतदारसंघामध्ये पाऊस पाणी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची, त्यांच्या कुटुंबाची व मित्रपरिवाराची काळजी मला आहे.एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच हिंदूत्व जोपासणारा मी माणूस आहे. २१ तारखेपासून एकदम आनंदामध्ये आहे.#संभाजीनगर जिल्ह्यातील #वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.