ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पक्षाविरोधी पावले उचलली म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिक्षा म्हणून गटनेते पदावरुन हटवलं. तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. बंडाळीनंतर एकनाथ शिंदेंवर हि पहिली कारवाई करण्यात आली आहे. कारवाई होताच शिंदे यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. सत्तेसाठी कधीही प्रतारण केली नाही आणि करणार नाही असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. (Eknath Shinde Update News)
एकनाथ शिंदे काय म्हणाले ट्विटमध्ये
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारण केली नाही आणि करणार नाही असे ट्विट केले आहे.
मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
हि बाळासाहेबांची शिवसेना नाही. तर सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना आहे असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. यावरुन एकनाथ शिंदे हे भाजपात प्रवेश करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यातुन त्यांनी वैचारिक बंड पुकारले असून हिंदुत्वाच्या विचारासोबत त्यांना जायचे आहे असे संकेत दिले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.