Tarun Bharat

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच भाजपसोबत जात सत्तेत सामील होण्याचे स्पष्टपणे संकेत दिले आहेत. ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र एकनाथ शिंदे यांनी आपले मौन सोडलं सत्तास्थापनेबाबत मोठा खुलासा करत मंत्रीविस्ताराबाबत देखील महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वित्तरवरून ही माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसांत राज्यात भाजपकडून सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून ६ कॅबिनेट मंत्रीपद आणि ६ राज्यमंत्री पदं मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कॅबिनेट मंत्री :
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

राज्यमंत्री :
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

Related Stories

काशीळ येथे दोन एसटी बसचा अपघात

Patil_p

रास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

Abhijeet Shinde

लसीकरणासाठी कर्नाटकचे स्वतंत्र अ‍ॅप

Abhijeet Shinde

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के

Rohan_P

हुपरीतील जैन मूर्ती लेखातून उलगडणार प्राचीन इतिहास

Abhijeet Shinde

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : डॉ नितीन राऊत

Rohan_P
error: Content is protected !!