Tarun Bharat

आम्ही शिवसेनेसोबत राहू पण…! एकनाथ शिंदे यांचे ‘तीन’ प्रस्ताव थेट वर्षावर

Advertisements

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या (shivsena) इतिहासातील सर्वात मोठा बंड पुकारला असून ३५ आमदारांना घेऊन त्यांनी गुजरात गाठले आहे. त्यामुळे सकाळपासूनच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीचे सरकार कोसळू शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संजय राठोड (sanjay rathod) यांना मध्यस्थी करण्यासाठी सुरतला पाठवण्यात आलेले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राठोड, दादा भुसे, मिलिंद नार्वेकर, आमदार रवी फाटक हे सुरत च्या दिशेने रवाना झालेत. ते मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करणार असून पुढील दिशा आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत राहू नये, अशी भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं संकट उभारलं आहे. राज्यातील सत्ता टिकवायची का? पक्षाचे ३५ आमदार टिकवायचे? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

दरम्यान, शिवसेनेवर नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे तीन प्रस्ताव ठेवलेत. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत केलेली युती बरखास्त करावी. आम्ही शिवसेनेसोबतच राहून आता सेनेने भाजपची सरकार स्थापन करावं, सरकार स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे राहतील, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Related Stories

मिरज पूर्वच्या वंचित भागाला मिळणार म्हैसाळचे पाणी

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांना घरी उपचार घेता येणार नाही

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये आज ३३ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p

अर्थव्यवस्थेत ४ दशकातील सर्वात मोठी घसरण

Amit Kulkarni

दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात भित्तिपत्रके ; १५ जणांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!