एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा रिंगणात
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. ६ ऑगस्ट रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर मतदान झाल्यांनतर लगेच उद्याच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक (Vice President Election) उद्या होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करणार आहेत. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मतदान करण्याचे आवाहन खासदारांना केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप नाही. त्यामुळे भीती न बाळगता मतदान करा. उपराष्ट्रपती हा देशासाठी काम करणारा, निष्पक्ष असावा यासाठी मला मतदान करा, असे आवाहन मार्गारेट अल्वा यांनी केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. ६ ऑगस्ट रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर मतदान झाल्यांनतर लगेच उद्याच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
हे ही वाचा : देशात चार लोकांची हुकूमशाही; राहुल गांधींचा भाजपवर घणाघात
दोन्ही उमेदवार माजी राज्यपाल
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार हे माजी राज्यपाल आहेत. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाला होत्या. दोघेही माजी मंत्री असून पेशाने वकील आहेत.