Election of Dattatray Gawde as President of Malvan Painting Association
मालवण तालुका चिरेखाण संघटनेची बैठक मंगळवार दि.२२ नोव्हें.रोजी सायंकाळी चौके येथील श्री देवी भराडी मंदिर येथे घेण्यात आली..यावेळी यापूर्वी असलेल्या चिरेखाण सघटनेमध्ये बदल करून नविन मालवण तालुका चिरेखाण संघटना सर्वानुमते स्थापन करण्यात आली.या नविन संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाणव्यावसाईक श्री.दत्तात्रय गावडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी श्री निलेश पांजरी,श्री.रामचंद्र चव्हाण सचिव म्हणून श्री.किरण गावडे खजिनदारपदी श्री.संदेश गावडे यांची निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी श्री.शेलेश कांबळी,सागर गोवेकर,मोहन गावडे,अजित गावडे,रामचंद्र करलकर,शिवाजी गावडे,ज्ञ्रृषिकेश वराडकर यांची निवड करण्यात आली.जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री. संतोष गावडे,श्री.बिंजेद्र गावडे,श्री.पाप्पा माडलकर,श्री.सुबोध पालव,श्री.कृष्णा गावडे,श्री.सचिन आबेरकर,श्री .विकास हडकर,श्री .भाऊ हडकर यांच्या सह सर्व चिरेखाण व्यवसायिक उपस्थित होते.
चौके- प्रतिनिधी