Election of Dodamarg Taluka Purchase-Sales Team unopposed
दोडामार्ग तालुका सह. खरेदी विक्री संघ अध्यक्ष पदी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष दिनकर नानचे यांची तर उपाध्यक्ष पदी कुडासे येथील अशोक मुरारी सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली. काही दिवसांपूर्वी या संघाच्या झालेल्या निवडणुकीत सर्व संचालक सुद्धा बिनविरोधच निवडून आले होते. या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे.
आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक होती. यात अध्यक्ष पदासाठी संतोष नानचे व उपाध्यक्ष पदासाठी अशोक सावंत या दोघांचेच अर्ज आले होते. निवडणुकीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर निवडणूक अधिकारी अनिल श्रीरसागर व पल्लवी पई यांनी या दोघांची निवड जाहीर केली. या निवडी जाहीर झाल्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, रमेश दळवी, चंदू मळीक, अमित प्रसादी, बाळा कोरगावकर, सुनील म्हावळणकर, संचालक अभिमन्यू कुबल, संजय गवस, ज्ञानेश्वर गवस, कल्पना बुडकुले, उपेक्षा पांगम, पांडुरंग कदम आदी उपस्थित होते.
दोडामार्ग / प्रतिनिधी