Tarun Bharat

नगराध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने होणार

प्रतिनिधी /पणजी

नगरपालिका मंडळाच्या अध्यक्षांची निवड ‘गुप्त मतदान’ पद्धतीने करण्यात येणार असल्याचे उत्तर ऍड. जनरल देवीदास पांगम यांनी सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायायलयाच्या गोवा खंडपीठात दिले आहे. यामुळे यापुढे गोव्यातील नगराध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षांना पदावरून काढून टाकण्यासाठी किंवा त्यांची निवड करण्यासाठी गुप्त किंवा हात उंचावून मतदान करण्याचे अधिकार निर्वाचन अधिकाऱयाला आहे काय? अशी विचारण करणारी याचिका गोवा खंडपीठासमोर आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना पांगम यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली. घनःश्याम शिरोडकर यांना मडगाव नगराध्यक्षपदावरून पायउतार केल्यानंतर सदर याचिका खंडपीठासमोर आली होती. सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर ती याचिका खंडपीठाने निकालात काढली आहे.

Related Stories

स्व.भाऊसाहेब बांदोडकर मैदानाला विकासाचा नवा साज

Amit Kulkarni

पाशवी बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प संमत

Omkar B

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाची सांगता

Patil_p

मुखर्जी स्टेडियम आता कोविड केअर सेंटर

Omkar B

आकाशी झेप घेण्यास मोप सज्ज!

Patil_p

गांधी मार्केटातील फळ-भाजी विक्रेते रवींद्र भवन मार्गावर दुकाने थाटणार

Patil_p
error: Content is protected !!