मुंबई महापालिकेच्य़ा निवडणुका (Mumbai Municipal Corporation) एकत्र लढण्याचे ठरले असून सुरवातील 83 जागांवर निवडणूका लढणार होतो. पण आता शिवसेना (ठाकरे गट) कीती जागा लढवणार आहे तेव्हढ्याच जागा लढवण्याचे आम्ही ठरवले असल्याचे मत वंचित बहूजन आघाडीचे (VBA) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडी यांची काही दिवसांपासून युतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुंबई महापालिका निवडणुकांसाठी पहिल्यांदा आम्ही 83 जागांवर लढण्याच्या विचारात होतो. पण आता ठाकरे आणि आम्ही दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले असून असून शिवसेना जेव्हढी जागा लढवेल तेव्हढीच जागा आम्ही लढवू” असे ते म्हणाले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर आपली भुमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “फक्त शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीमध्येच बोलणी चालू आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसह त्यानंरही येणाऱ्या निवडणुकांसाठी एकत्र सामोरे जाऊ असंही ठरले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे सुद्धा आमच्या बरोबर यावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. या देन्ही पक्षांना आमचा विरोध नाही. पण माझ्या माहीतीनुसार या आघाडीला राष्ट्रवादीचा विरोध असून कॉंग्रेसचाही छूपा विरोध आहे. गरीब मराठा सत्तेत यावा याच्या विरोधात दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळेच वंचितला त्यांचा विरोध आहे.” असेही ते म्हणाले.


previous post
next post