Tarun Bharat

काणकोणच्या 5 पंचायतींत सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध होणार

Advertisements

नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत नावे निश्चित

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोण मतदारसंघातील 6 पैकी 5 पंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची बिनविरोध निवड होणार असून काणकोणचे आमदार असलेले सभापती रमेश तवडकर यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांची शिष्टाई सफल झाली आहे. 

स्थानिक स्वराज संस्थेत गटबाजी आल्यास एकंदर विकासकामांवर परिणाम होत असतो. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध व्हायला हवी. ‘काणकोण व्हिजन अँड मिशन’ हे आपले स्वप्न असून मतदारसंघातील सर्वांना बरोबर घेऊन गेल्यास ते शक्य होणार आहे. याचा विचार करून आपण या मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित पंचायत सदस्यांची बैठक बोलाविली. सर्वांची मते जाणून घेतली. सत्तास्थानी असलेल्या भाजप सरकारचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज असल्याचे सर्वांना पटवून दिल्यानंतर लोलये, पैंगीण, खोतीगाव, श्रीस्थळ आणि आगोंद पंचायतीमधील सदस्य राजी झाले आहेत. गावडोंगरी पंचायतीमध्ये देखील बिनविरोध निवड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती सभापती तवडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

त्यानुसार लोलये पोळे पंचायतीत प्रतिजा बांदेकर आणि चंद्रकांत सुदिर, पैंगीणमध्ये सविता तवडकर व सुनील पैंगणकर, खोतीगावात आनंदू देसाई आणि पूनम गावकर, श्रीस्थळमध्ये सेजल गावकर आणि शिवराज नाईक देशमुख व आगोंद पंचायतीमध्ये फातिमा रॉड्रिग्स व प्रीतल फर्नांडिस यांची नावे अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदासाठी निश्चित करण्यात आली असून बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविलेला आहे. या मतदारसंघातील श्रीस्थळ, पैंगीण आणि लोलये पोळे या तीन पंचायतींचे सरपंचपद, तर आगोंद व खोल पंचायतींमध्ये उपसरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. खोल पंचायतीत अजय पागी, कृष्णा वेळीप व पंढरी प्रभुदेसाई हे तीन सदस्य सरपंचपदाचे दावेदार असून माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यावर तोडगा काढतील, असा विश्वास सभापती तवडकर यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

आमदार ऍड. कार्लुसनी केली तार नदीची होडीने प्रत्यक्ष पाहणी

Amit Kulkarni

साखर उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’!

Omkar B

ताळगावात शेतकऱयांना मोफत भातकापणी यंत्र

Amit Kulkarni

गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन सुरुच. आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Omkar B

युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

केजरीवालांचा रोजगार वर्षाव गोव्यात अशक्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!