Tarun Bharat

विद्यापीठातील विविध पदांसाठी १४ नोव्हेंबरला निवडणूक

Advertisements

संकेतस्थळावर निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर : यंदा 49 हजार 939 पदवीधर मतदारांची नोंदणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया पदवीधर मतदार नोंदणीपासून सुरू झाली. 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. यामध्ये विद्यापीठातील दहा प्राचार्य, सहा व्यवस्थापन प्रतिनिधी, दहा महाविद्यालयीन प्राध्यापक, तीन विद्यापीठ प्राध्यापक आणि दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सदस्य, विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापकांमधून आठ प्राध्यापक विद्यापरिषदेवर, चाळीस सदस्य अभ्यासमंडळावर तीन महाविद्यालयीन विभागप्रमुख या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीस मतदार नोंदणीची मुदत संपली असून, यंदा 49 हजार 939 पदवीधर मतदारांनी नावनोंदणी केली. तसेच शिक्षक 208, महाविद्यालय 277 , विभागप्रमुख 195, महाविद्यालय प्राचार्यांची आणि 118 व्यवस्थापन प्रतिनिधींची नावनोंदणी केली आहे. 14 नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 21 सप्टेंबर तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द केली आहे. 26 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तात्पुरत्या मतदार यादीमध्ये वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदीबाबत कुलसचिव यांच्याकडे दुरूस्ती आक्षेप नोंदवायचा आहे. 1 ऑक्टोबर रोजी दुरूस्त मतदार यादी जाहीर होणार आहे. 6 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुरूस्त मतदार यादीसंदर्भात काही आक्षेप असल्यास कुलगुरू यांच्याकडे तक्रार करायची आहे. 12 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. निवडणूक सूचना 14 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होईल. 31 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करून वैध, अवैध उमेदवारी अर्ज जाहीर होणार. 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख. 2 नोव्हेंबर सायंकाळी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांच्या वैधतेबाबत कुलगुरू यांच्याकडे तक्रार करावी. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होणार. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून निकाल जाहीर होणार. तरी संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या वेळापत्रकाची शिक्षणसंस्था, महाविद्यालय, अधिविभाग प्राध्यापक, पदवीधर मतदार यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम जमा करण्याचा आदेश रद्द करा

Abhijeet Shinde

मुसळधार पावसाने रस्ते जलमय

Amit Kulkarni

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे राहणार बंदच

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर वाॅर्ड’मध्ये आग

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्थानिक प्रशासनाच्या ‘मनमानी बंद’ला इंजिनिअरिंग औद्योगिक संघटनांचा विरोध

Abhijeet Shinde

नगरपालिका शिक्षण मंडळ सेवक सहकारी संस्थेतर्फे लाभांश जाहीर

Patil_p
error: Content is protected !!