ज्यादा तिकीट दर खासगी वाहनांना पडणार महागात
प्रतिनिधी, राहुल गडकर
Kolhapur News : सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट करणाऱ्या खाजगी वाहनावर कारवाई करणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिलाय. याबाबतचे आदेश कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाने जारी केलेत. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त तिकीट दर घेता येणार नाही, शासन नियमाच्या 50% तिकीट दर आकारता येणाराय. त्यामुळे ज्यादा तिकीट दर आकारणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. दिवाळीच्या तोंडावर खाजगी वाहनांचे तिकीट दर वाढवले जातात, मात्र विभागाच्या या आदेशामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय अंतर्गत येणाऱ्या विभागीय कार्यशाळेत भलताच प्रकार उघडकीस आला आहे. एक महिला अधिकारी त्याची स्वतःची मालकीची असलेली मोपेड कार कार्यालयातच चार्जिंग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून वरिष्ठ अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे त्याबाबतचा तक्रार अर्ज देखील एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. 6 ऑक्टोबर रोजी हा तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागीय अंतर्गत येणाऱ्या ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळेतील हा प्रकार आहे. कोल्हापूर विभागात उपयंत्र अभियंता पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या बाबत ही तक्रार करण्यात आली आहे. संबंधित महिला अधिकारी रोज इलेक्ट्रिक मोपेड चार्जिंग करत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. सुरक्षा दक्षता विभागाने स्वतः खात्री करून शहानिशा केलेली आहे. तर त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महामंडळाची वीज ही शासकीय मालमत्ता असून सुद्धा स्वतःच्या पदाचा गैरवापर करून शासकीय विजेची म्हणजेच शासकीय मालमत्तेची चोरी करून बेकायदेशीर रित्या स्वतःसाठी वापरणे, हा कायद्याने गुन्हा असल्याचं या तक्रारीत म्हटले आहे. महामंडळाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देखील या तक्रार अर्जात केली आहे.
विभागीय कार्यशाळा येथील या प्रकाराची तक्रार आलेली आहे. त्याबाबत चौकशी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.
अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, कोल्हापूर