Tarun Bharat

इलेक्ट्रीक हायवेचे काम सुरू

Advertisements

गडकरी यांची इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 सरकार सौरऊर्जेद्वारे विद्युत महामार्ग विकसित करण्यावर काम करत आहे. यामुळे जास्त मालवाहतूक क्षमता असलेल्या ट्रक आणि बसेस यांच्यासाठीची चार्जिंग सुविधा सुलभ करणे शक्य होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले. 

उद्योग संस्था इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना, गडकरी यांनी पुनरुच्चार केला की सरकार देशाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विद्युतीकरण करू इच्छित आहे. ‘सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे,’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्युत महामार्ग म्हणजे अशा रस्त्याचा संदर्भ आहे जो त्यावरून प्रवास करणाऱया वाहनांना वीज पुरवठा करतो. यामध्ये ‘ओव्हरहेड’ पॉवर लाईन्सद्वारे ऊर्जा पुरवठय़ाचा समावेश आहे, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

भारत व अमेरिका नैसर्गिक भागीदार

भारत आणि अमेरिका हे दोन्ही नैसर्गिक भागीदार आहेत. यामुळे  अमेरिकेच्या खाजगी गुंतवणूकदारांना भारतातील ‘लॉजिस्टिक, रोपवे आणि केबल कार’ क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  राष्ट्रीय महामार्गांच्या आजूबाजूला सुमारे तीन कोटी झाडे लावण्यात येणार असून महामार्गाच्या बांधकाम आणि विस्तारीकरणादरम्यान वृक्षारोपण केले जात आहे, असेही मंत्री म्हणाले.

Related Stories

भारताची अर्थव्यवस्था 4 टक्के आक्रसणार

Patil_p

हायड्रोजन क्षेत्रात 150 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे संकेत

Patil_p

टीजेएसबीच्या नफ्यात विक्रमी वाढ

Patil_p

7 कंपन्यांची 1.31 लाख कोटीची भर

Patil_p

दमानींच्या कंपनीचे समभाग उच्चांकी पातळीवर

Patil_p

जुलैमध्ये देशांतर्गत कंपन्यांची विदेशी गुंतवणूक 50 टक्क्यांनी घसरली

Amit Kulkarni
error: Content is protected !!