Tarun Bharat

ऍम्बेसेडर कारचे इलेक्ट्रिक मॉडेल

हिंदुस्थान मोर्ट्स पुन्हा करणार दमदार एण्ट्री : इलेक्ट्रिक कारसह स्कूटरचाही राहणार समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऍम्बेसेडर कारची निर्मिती करणारी हिंदुस्थान मोटर्स कंपनी मार्केटमध्ये पुन्हा उतरण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे. कंपनी येत्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरसोबत ऍम्बेसेडर इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार असल्याची माहिती आहे.

प्रेंच कंपनीसोबत संयुक्त भागीदारीमध्ये ऍम्बेसेडर भारतामध्ये इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. यामध्ये द हिंद फायनाशिअल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या प्रेंचच्या ऑटो मॅन्युफॅक्चरसोबत मिळून करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

भारतीय बाजारात 70 च्या दशकामध्ये आपले राज्य निर्माण केलेली ऍम्बेसेडर कंपनीने भारतीय वाहन बाजारात जवळपास 70 टक्केपेक्षा अधिकचा ताबा प्राप्त केला होता.

इतक्या वर्षापर्यंत बाजारामध्ये स्वतःचे वेगळे स्थान ऍम्बेसेडरला राखता आले आहे. पण नंतर मात्र लोकप्रियतेत घसरण राहिली. यासाठी कंपनीने प्यूजो नावाच्या कंपनीला ऍस्बेसेडर नाव आणि त्याचे अधिकार यांची 80 कोटी रुपयामध्ये विक्री केली.

कधी व केव्हा सुरु झाले मॅन्युफॅक्चरिंग

आता हिंदुस्थान मोर्ट्सने फ्रान्सची वाहन उत्पादन प्यूजोसोबत हातमिळवणी केली आहे. या प्रक्रियेला जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंपनी सर्वात अगोदर इलेक्ट्रिक टू व्हीलर्सवर काम करणार आहे. नंतर पुन्हा लेजेंडरी कार अम्बेसेडरला दोन वर्षात भारतीय बाजारात दाखल करणार असल्याचे संकेत आहेत. या कारची हिंदुस्थान मोर्ट्सच्या चेन्नई येथील मॅन्यूफॅक्चरिंग प्रकल्पात निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

नवीन डिझाईनमध्ये ऍम्बेसेडर येणार

सदरची कार एक इलेक्ट्रिक सेडान कार राहणार आहे. ज्यामध्ये इंटीरिअर आणि एक्सटीरियर पूर्णपणे वेगळे राहणार आहे. कंपनी जुन्या चुकांना सुधारत नवे मॉडेल दाखल करणार आहे, अशी माहिती मीडिया अहवालानुसार देण्यात आली आहे.

Related Stories

होंडाची ‘ऍक्टीव्हा 6 जी’ लवकरच बाजारात

prashant_c

हिरोची ई स्कूटर लवकरच होणार सादर

Patil_p

जूनमध्ये वाहन विक्रीत उत्साहवर्धक वाढ

Amit Kulkarni

व्होल्वो कार्सच्या विक्रीत वृद्धी

Patil_p

‘ओला’ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्रीत दमदार चमक

Patil_p

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p