Tarun Bharat

इलेक्ट्रिक वन-आयपॉवरची होणार 500 सेवा केंद्रे

नवी दिल्ली

इलेक्ट्रिक वन आणि आयपॉवर बॅटरीज यांनी एकत्रित येत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 500 इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चेकअप व बदली केंद्रांची स्थापना करण्याचे नियोजन केले आहे. ही केंद्रे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची तपासणी करतील व आवश्यक वाटल्यास लिथीयम आयन बॅटरी बदलून देण्याची व्यवस्थाही या केंद्रांवर होईल. 

 देशभरात येणाऱया काळात 500 अशी सेवा केंद्रे सुरु केली जाणार असून त्याकरीता पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

यांना मिळणार सेवेचा लाभ

विविध इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांच्या वाहनांकरीता ही केंद्रे सेवा देतील, असे दोन्ही कंपन्यांकडून सांगितले जात आहे. हिरो इलेक्ट्रिक, ओकीनावा, ऍम्पीअर, बेनलिंग, कायनेटीक व ओकाया आदी कंपन्यांना ही केंद्रे सेवा देतील, असे सांगितले जाते.

Related Stories

देशात कार निर्मितीत अव्वल कोण?

Patil_p

मार्च 2022 पर्यंत आसाममध्ये विविध बँकांच्या शाखा

Amit Kulkarni

जागतिक प्रमुख बाजारांमध्ये निस्सानच्या ‘मॅग्नाइट’ची निर्यात

Patil_p

दूरसंचार कंपन्यांची जीएसटी परताव्याची मागणी

Patil_p

कोरोना इतकाच भयप्रद कर्जांचा विळखा !

Patil_p

हिरोची मास्ट्रो स्कुटर बाजारात दाखल

Patil_p