Tarun Bharat

इलेक्ट्रिक स्कूटर ‘इंडी’ लाँच

पूर्ण चार्जिंगवर 120 किमी रेंज धावणार : किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरु

नवी दिल्ली :  बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक स्टार्टअप कंपनी रिव्हरने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘इंडी’ लाँच केली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर जवळपास 120 किलोमीटरपर्यंत (इको मोडवर) मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ई-स्कूटरमध्ये 4 केडब्लूएच क्षमतेच्या बॅटरी पॅकसह 6.7 केडब्लूची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. ही स्कूटर 3.9 सेकंदात 40 किमी/तासचा वेग गाठू शकते. त्याची बॅटरी 5 तासात 0 ते 80टक्केपर्यंत चार्ज होऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज केल्यावर 120 किलोमीटरपर्यंत (इको मोडवर) राइडिंग रेंज मिळेल. त्याचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. इंडी ई-स्कूटरमध्ये इको, राइड आणि रश असे तीन राइडिंग मोड मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

चेतकची किंमत वाढली

Patil_p

बजाज पल्सर एफ व एन 250 दाखल

Amit Kulkarni

ओलाची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून

Patil_p

चीनमध्ये वाहन विक्रीत 14.5 टक्क्मयांची वृद्धी

Patil_p

हिरो इलेक्ट्रिककडून 20 हजार जणांना प्रशिक्षण

Patil_p

हिरो पॅशन एक्सटेक दुचाकी सादर

Patil_p