Tarun Bharat

इलेक्ट्रिक टियागोला मिळतोय दमदार प्रतिसाद

20 हजार जणांनी केली गाडी बुक

कोलकाता/ वृत्तसंस्था

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून नोंदल्या गेलेल्या टाटा टियागो इलेक्ट्रिक कारच्या बुकिंगला ग्राहकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. 30 दिवसाच्या कालावधीमध्ये 20000 जणांनी कंपनीची नवी इलेक्ट्रिक टियागो गाडी बुक केल्याची माहिती आहे. कंपनीने सदरची नवी गाडी 28 सप्टेंबरला लॉन्च केली होती. मात्र त्यावेळी गाडीचे बुकिंग सुरू झालेले नव्हते.

 महिन्याभरात वाढली संख्या

कंपनीने या गाडीची सुरुवातीची सवलतीतील किंमत 8.49 लाख रुपये इतकी ठेवली आहे. पहिल्या 10 हजार जणांसाठी ती निश्चित केली होती पण कंपनीने हा निकष बदलत पुढच्या 10 हजार ग्राहकांनादेखील याच सुरुवातीच्या किमतीमध्ये गाडी बुक करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यामुळे महिन्याभरातच 20000 जणांनी ही गाडी बुक केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या गाडीच्या टॉप व्हेरियंट गाडीची किंमत ही 11.79 लाख रुपये इतकी आहे.

कधी मिळणार डिलीव्हरी?

सदरची गाडी बुक केलेल्या ग्राहकांना गाडीचे वितरण जानेवारी 2023 पासून केले जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पाच रंगांच्या पर्यायांमध्ये ही गाडी दाखल करण्यात आली असून जवळपास सात व्हेरियंटमध्ये ही गाडी कंपनीने सादर केली आहे.

Related Stories

टाटाच्या इलेक्ट्रिक टिगोरचे बुकिंग सुरू

Patil_p

महिंद्राची नवी स्कॉर्पिओ क्लासिक लाँच

Patil_p

टाटा मोटर्सची 1 लाखावी अल्ट्रोज दाखल

Patil_p

इलेक्ट्रिक स्कूटरमधील आग : नव्या लाँचिंगवर येणार निर्बंध ?

Amit Kulkarni

‘Yamaha RX100’ पुन्हा लॉन्च ..!

Rohit Salunke

बजाज प्लॅटिना-110 एबीएस सादर

Patil_p