Tarun Bharat

जिवावर बेतणारी नोकरी करत विजेच्या तारांशी संघर्ष सुरचं

Advertisements

खोची/वार्ताहर (भानुदास गायकवाड)

महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांची महापूर,सोसाट्याचा वारा,पाऊस आणि कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत विजेच्या ताराशी लढाई सुरू असते.जिवावर बेतणारी नोकरी करीत त्यांना पाऊस,वाऱ्यासह, महापुरात ही तारांशी संघर्ष करावा लागतो.जिल्ह्यात पडत असलेला मोठा पूर परिस्थिती अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून वायरमन वीज पुरवठा सुरळीत ठेवून मोठी कामगिरी बजावत आहेत.औटघटकेचा अंधार सहन न होणाऱ्या ग्राहकांनी आमच्या जीवन संघर्षाचा छोटासा अनुभव घेतला,तरी केलेल्या कामाचे सार्थक होईल,अशी त्यांची अपेक्षा असते.

जिवावर बेतणारे काम करूनही समाधानाने नोकरी करता येत नाही. सतत प्रकाशझोतात असलेल्या शहरी जीवनाला ग्रामीण व दुर्गम भागातील विजेचा लपंडाव कधीतरीच अनुभवायला मिळतो.आज प्रत्येक वाडी-वस्तीवर विज पोचली असली, तरी पावसाळ्यात ही वीज बेभरवशाची असते.तारावर कधी झाड कोसळेल, कधी तुटतील याचा नेम नसतो. दऱ्याखोऱ्याच्या भागात तर वीज कर्मचाऱ्यांची कामगिरी पाहण्याचा प्रसंग म्हणजे अंगावर शहारे आणणारी घटनाच म्हणावी लागेल.

पावसात वीज खंडित झाल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची चाललेली लढाई त्यांच्या जीवनमरणाचा खेळ म्हणावा लागेल.डाबांवर चढून तुटलेली वीजवाहक तारा ओढणे किंवा जोडणे- तोडणे म्हणजे वायरमनचा पुनर्जन्म असा अनुभव येतो,असे ते स्वतः म्हणतात.अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची त्यांनी मानसिकता ठेवलेले असते.ग्राहक आणि अधिकारी निवार्‍याला सुखरूप असतात.मात्र वीज कर्मचारी वीजवाहक तारांच्या संपर्कात जनू मृत्यशी झुंज देत असतात.यामध्ये आमच्या अनेक सहकाऱ्यांचे बळी गेले आहेत.त्यांची कुटुंबे उध्वस्त झालेीआहेत. तर काही कुटुंबे वाऱ्यावर पडली आहेत.

वायरमनाला सहानुभूतीची गरज नाही.त्यांची मागणी आहे,ती केवळ ग्राहकाकडून चांगली वागणूक मिळावी इतकीच. वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळतात.ते पुन्हा उभे करणे मोठे जोखमीचे काम असते. यासाठी वायरमनाना कसरत करावी लागते.एखादी चूक झाल्यास जीवावर बेतते.तेव्हा कोणीही कुटुंबाच्या पाठीशी राहत नाही,ही खेदाची बाब आहे.
प्रशांत बावडे, वीज तंत्रज्ञ,(बहादूरवाडी)

संजय जाखलेच्या आठवणी
२०१९ च्या महापुरात खोची येथील वीज तंत्रज्ञ संजय जाखले यांचा दुधगाव (ता.मिरज) येथे महापूरात गाव पाणीपुरवठा सुरळीत करत असताना विजेचा धक्का बसून जागीच पाण्यात पडून मृत्यू झाला होता.त्यांनी जीवावर उदार होऊन महापुरातही दुधगाव गावाचा वीज पुरवठा सुरळीत ठेवला होता. अखेर शेवटच्या टप्प्यातील वीज पुरवठा सुरळीत करताना त्यांना जीव गमवावा लागला.आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली.त्यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त उपस्थित गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहात या घटनेला उजळला दिला.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात 700 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन

Abhijeet Shinde

किमान विक्री दर वाढीसह हवे द्विस्तरीय साखर धोरण; साखर उद्योगाची मागणी

Abhijeet Khandekar

Ratnagiri; तुडुंब भरलेली एसटी बस परशुराम घाटात कोसळता- कोसळता बचावली

Abhijeet Khandekar

लिंकींगची सक्ती केल्यास कंपन्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

कणेरीवाडी फाट्याजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

Abhijeet Shinde

उसने पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!