Tarun Bharat

सावंतवाडीत इलेक्ट्रॉनिक गोदामाला आग

Advertisements

अडीच लाखाचे नुकसान

प्रतिनिधी/ सावंतवाडी

सावंतवाडी उभाबाजार येथील परेश उर्फ मुन्ना मुद्राळे यांच्या पडवीवजा गोदामाला आगा लागून अडीच लाखाचे नुकसान झाले. यात इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडंन खाक झाले. सदर घटना सकाळी 8.30 दरम्यान घडली. पडवीत असलेल्या चुलीच्या लाकडाने पेट घेतल्याने सदर आग लागल्याचे समोर आले.

आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. सतर्क नागरिकांना घटनास्थळी वेळीच धाव घेऊन आग विझवण्यात प्रारंभ केला.

सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब देखील घटनास्थळी दाखल झाला. परंतु घटनास्थळी पर्यंत बंब जाण्याइतपत रस्ता नसल्याने आग विझवण्यात गैरसोय झाली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आनंद नेवगी, दिनेश कुबडे आदींनी याकामी मदत केली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला.

Related Stories

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे ब्रीच कँडीत

Abhijeet Shinde

लसीकरण उत्सव; नरेंद्र मोदींनी पत्र लिहित केले ‘हे’ आवाहन

Abhijeet Shinde

सभासदांना म्युट करुन सभा गुंडाळली

Abhijeet Shinde

आमदारांच्या अपात्रतेचा फैसला १ ऑगस्टला ; कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

Abhijeet Khandekar

कोरोनाचा नवा XE व्हेरियंट Omicron पेक्षा धोकादायक – WHO

Abhijeet Shinde

गुजरातमध्ये ३ हजार किलो ड्रग्ज सापडल्यानंतर अमित शाह यांचा मोठा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!